Gondwana university : नवसंशोधन केंद्रासाठी निधीचा पहिला हप्ता प्राप्त

0
39
नवसंशोधन केंद्रासाठी निधीचा पहिला हप्ता प्राप्त
– 5 कोटी पैकी 25 लाखाचा निधी मिळाल्याची कुलगुरुंची माहिती
गडचिरोली : कौशल्य विकास व रोजगार निर्मिती मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे गोंडवाना विद्यापीठाला वर्ग 1 चे नवसंशोधन केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी पाच वर्षांत तब्बल 5 कोटींचे अर्थसाह्य मिळणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचा 25 लाखांचा निधी नुकताच प्राप्त झाला असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिली आहे.

गोंडवाना विद्यापीठ

 गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनउपज व वनौषधी आढळतात. जे स्थानिक आदिवासी समूदायाच्या उपजिविकेचे मुख्य स्त्रोत आहे. हीच बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठाचे वनउपज क्षेत्रातून अधिकाधिक स्टार्टअप कसे तयार होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्रामार्फत सुरू असलेले उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे युवकांमध्ये उद्योजकतेला चालना मिळत आहे.

1 हजार चौफु जागेत कार्यान्वित

सद्यस्थितीत सदर नवसंशोधन केंद्र विद्यापीठाच्या नूतन प्रशस्त इमारतीत 1 हजार चौ. फू. समर्पित जागेत कार्यान्वित आहे. नवद्योजक निर्मिती करिता एकूण 8 व्यवसाय अनुलंबाची ओळख करण्यात आलेली आहे. तसेच नवउद्योजक निर्मिती हेतू लागणारे कलम 8 प्रमंडळ नोंदणी करून निर्गमित करण्यात आले आहे. केंद्राने दैनंदिन कामकाज व मार्गदर्शन हेतूने संचालक मंडळ तसेच कार्यकारी समितीचे गठण केले आहे. विद्यापीठाने वर्ग 1 इन्क्युबेटरचा तपशिलवार प्रस्ताव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागास सादर केलेला होता.

25 नवउद्योजक निर्मितीचे लक्ष्य

सदर नवसंशोधन केंद्रास 5 वर्षे कालावधीकरिता 5 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यतेची तरतूद शासनाकडून होती. त्यातील पहिल्या टप्प्याचा 25 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. किमान 25 नवउद्योजक निर्मितीचे लक्ष्य या केंद्रातर्फे आहे. सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्रातील उद्योजकांनी 6 हर्बल उत्पादने आणि 15 पंचगव्य आधारित उत्पादने तयार केली आहेत. सदर इन्क्युबेटर स्थापित करण्याकरिता विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांचे कुशल नेतृत्व व व्यापक अनुभव तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचे मार्गदर्शन आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांचे सहकार्य लाभले. तसेच नवसंशोधन केद्राचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार यांच्या परिश्रमाचे हे फलित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here