घरकूल लाभार्थ्यांची भूमिअभिलेख कार्यालयावर धडक Gharkul beneficiaries strike at land records office

0
27
घरकूल लाभार्थ्यांची भूमिअभिलेख कार्यालयावर धडक
– कर्मचा-यांच्या अनुपस्थितीमुळे लाभार्थी त्रस्त
आरमोरी : आखिव पत्रिकेवर नाव चढविण्यासाठी घरकूल लाभार्थी वारंवार भूमिअभिलेख कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. मात्र कार्यालयात वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने त्रस्त लाभार्थ्यांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात भूमीअभिलेख कार्यालयावर धडक दिली. परंतु त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

गौरगरीब, अल्पभूधारक लाभार्थ्यांना राहण्यासाठी चांगला निवारा मिळावा या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री शहरी आवास योजना सुरू केली. आरमोरी नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात सदर घरकुल योजना मंजूर करण्यात आली. परंतु यासाठी आखिव पत्रिकेवर लाभार्थ्यांचे नाव असणे गरजेचे आहे. जागा हद्दवाढ झाली. परंतु आखिव पत्रिकेवर सरकार मालक नावाने असल्यामुळे घरकुलाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे लाभार्थी वारंवार भूमिअभिलेख कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. दरम्यान, आज काही लाभार्थी आरमोरी येथील भूमिअभिलेख कार्यालयात कामासाठी गेले असता, वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे लाभार्थ्यांना परत जावे लागले. याची माहिती लाभार्थ्यांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी दिली. त्यांनी लाभार्थ्यासह भूमिअभिलेख कार्यालयावर धडक दिली. परंतु त्या ठिकाणी एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

आंदोलनाचा इशारा

आरमोरी नगरपरिषद हद्दीत घरकूल लाभार्थ्यांच्या आखिव पत्रिका येत्या काही दिवसात न मिळाल्यास तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, अनिल किरमे, दिवाकर पोटफोडे, मोरेश्वर धारणे, हरीदास हजारे, टिकाराम दुमाने, विठ्ठल हजारे, गजानन डोंगरे, प्रभाकर मेत्राम व लाभार्थ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here