भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

0
33

-चंद्रपूर- मूल मार्गावरील अपघात 

गडचिरोली : चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या चारचाकीच्या अपघातात चालकासह एका महिलेचा मृत्यू व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी फाट्याजवळ घडली. चालक वैभव विलास जुआरे (२८), गंगाबाई मलया गुरम (४५) दोन्ही राहणार गडचिरोली असे मृतकांचे नाव आहे. तर मलया विस्तारी गुरम (५२) रा. गोकुलनगर हे जखमी आहेत.   

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी फाट्याजवळ चालकाचे चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला वाहनाची जब्बर धडक बसली.  हा अपघात एवढा भीषण होता की, चालकासह एका महिलेचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर मृतक महिलेचा पती जखमी अवस्थेत आहे. या अपघातात वाहनाचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आहे.     

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here