A case of murder : ‘त्या’ आरोपीची निर्दोष मुक्तता

0
38
A case of murder : ‘त्या’ आरोपीची निर्दोष मुक्तता
गडचिरोली : दोन वर्षापूर्वी घडलेल्या खुनाचा गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सदर निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश शुक्ल यांनी दिला आहे. आकाश किशोर कुम्मावार रा. अहेरी असे निर्दोश मुक्तता झालेल्याचे नाव आहे.
 

अहेरी पोलिस ठाणे हद्दीत जून 2021 मध्ये खुनाची घटना घडली होती. आपल्या आईची हत्या केल्याप्रकरणी आकाश कुम्मावार यास अहेरी पोलिसांनी अटक केली होती. सदर प्रकरणाचा तपास करुन अहेरी पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात एकूण 11 साक्षीदारांची फेरतपासणी करण्यात आली. मात्र सरकारी पक्षाला आकाश कुम्मावार यानेच त्याच्या आईची हत्या केल्याचे सिद्ध करता न आल्याने विद्यमान प्रधान सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांच्या न्यायालयाचे आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here