sucide : शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या

0
33
sucide : शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या
गडचिरोली : अभ्यास करण्यावरून आईने रागावल्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने रागाच्या भरात घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. पूनम गाथाराम निकुरे (१६) रा. इंदिरानगर, गडचिरोली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. 

संग्रहित छायाचित्र
प्राप्त माहितीनुसार, पूनम ही गडचिरोली शहरातील राणी दुर्गावती विद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. दहावीची परीक्षा जवळ आली असतानाही पूनम अभ्यास करीत नव्हती. अभ्यास करण्यासाठी आईने सांगितले असता पूनमने ही बाब मनावर घेतली. आईने पूनमला अंघोळ करण्यासाठी गरम पाणी टाकून ती थोड्या वेळासाठी घराच्या बाहेर निघाली. मुलगी अंघोळ करीत असावी, असा तिचा अंदाज झाला. घरी येऊन बघितले असता तिने घराच्या बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here