दारूविक्रेत्यांविरोधात महिलांचा एल्गार

0
33
Gadchiroli Today 
दारूविक्रेत्यांविरोधात महिलांचा एल्गार 
-मोहफुलाचा सडवा केला नष्ट 
धानोरा : गावात दारुबंदी असतानाही काही इसम लपून-छपून गावाबाहेर जंगलात दारु गाळत असल्याची माहिती मिळताच, महिला व ग्रामस्थांनी सदर ठिकाणी धाड टाकून मोहसडवा नष्ट केल्याची कारवाई तालुक्यातील दराची येथे केली. गावातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात एल्गार पुकारला आहे.   

   पोलिस स्टेशनमध्ये धडकलेले ग्रामसभेच्या महिला

धानोरा तालुक्यातील दराची येथील दारू मागील तीन वर्षापासून गावातील महिलांनी बंद केली आहे. तरीसुद्धा काही इसम लपून-छापून गावाबाहेरील जंगलात दारू गाळून विकत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा गावात दारू सुरू होऊन गावातील वातावरण बिघडू नये, यासाठी माराई माता महिला ग्रामसभेच्या सदस्य व ग्रामस्थांनी सदर ठिकाणी जाऊन जंगलात लपवून ठेवलेला मोहसडवा व दारू गाळण्याचे साहित्य उद्ध्वस्त केले. त्यानंतर महिलांनी घटनेची माहिती व दारू गाळणाऱ्याची नावे पोलिस स्टेशन धानोरा येथे जावून दिले. सदर इसमावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी कांता दुगा, चंद्रकला उईके, विमल उसेंडी, पार्वता तुलावी, सविता दुगा, सुमित्रा उईक, गिताबाई दुगा, सीता तुलावी, शशिकला आतला, उषा तुलावी, पल्लवी उईके, रजनी उईके, दयाराम दुगा, दसरू उसेंडी, प्रमोद उईके, रामू उईके, जितेंद्र उईके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here