Increased House Tax वाढीव घरटॅक्स सुनावणीत वंचितची धडक

0
38

वाढविलेले मालमत्ता कर रद्द करा

गडचिरोली : नगर परिषदेद्वारे वाढविलेल्या घरटॅक्स संदर्भाने बोलाविलेल्या जनसूनावणीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांनी सोमवारी धडक देत वाढविलेले मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी लावून धरली.
नगर परिषदेने वाढविलेल्या मालमत्ता कराच्या संदर्भाने आक्षेप व हरकती असणा-यांची जनसुनावणी आजपासून नगर परिषदेत घेण्यास सुरुवात झाली असतांना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसूनावणीत धडक देऊन अवाढवी वाढवलेले मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी प्राधिकृत मुल्यांकन अधिकारी अ. म. पार्लेवार यांच्याकडे लावून धरली. यावेळी उपस्थित अधिका-यांची बरीच तारांबळ उडाली व शेवटी मुख्याधिका-यांच्या दालनात विशेष बैठक आयोजीत करून वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या विशेष बैठकीत वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, गडचिरोलीचे माजी सरपंच सदरू नाथानी, मुल्यांकन अधिकारी अ. म. पार्लेवार, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, वंचितचे उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, नगर परिषद विभाग प्रमुख चिचघरे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, जिल्हा उपाध्यक्ष भोजराज रामटेके, सोमनाथ लाकडे, रवी निकोडे, मुकेश शेंडे, दिपक कोसमशिले, जानकिराम भुरसे, प्रभाकर जुनघरे, पुरूषोत्तम नंदगिरवार आदी उपस्थित होते.

शुल्कात सुधारणा करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
बैठकीत करयोग्य मुल्यावर आकारलेले 25 टक्के, उपयोगितेवर आकारलेले 7 टक्के, विशेष शिक्षणावर आकारलेले 7 टक्के आदी शुल्क कमी करण्याचे, तयार करण्यात आलेले उच्च वस्ती, मध्यम वस्ती, कनिष्ठ वस्ती या झोनमध्ये येणा-या मालमत्ता धारकांची पडताळणी करण्याचे, घरकुल योजनेअंतर्गत असणा-या लाभार्थ्यांना विशेष सवलत देण्याचे व अवाजवी असणा-या शुल्कात सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here