Cancer OPD सर्चमध्ये कर्करोग ओपीडीची सुविधा : डॉ. मानधनिया करणार उपचार

0
37
-गरजूनी लाभ घेण्याचे आवाहन 
गडचिरोली today 
गडचिरोली: गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोगावर उपचार घेता येणं कठीण आहे.  जवळच्या भागात रोगाचे निदान व उपचार झाले पाहिजे, याकरिता चातगाव येथील सर्च रुग्णालयात कॅन्सरची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. गुरुवार १६ फेब्रुवारीला कर्करोग ओपीडी आयोजीत केली आहे. ही ओपीडी सेवा नागपुरचे प्रसिद्ध तज्ञ डॉ. सुशील मांनधनिया दर महिन्याच्या तिसऱ्या र्‍या गुरुवारी पुरवतील. या सुविधेचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आपल्या सर्वांना माहित आहे की कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे आणि तो विविध कारणांमुळे विविध प्रकारचा असू शकतो. कॅन्सर फक्त तंबाखू खाणाऱ्या किंवा चघळणाऱ्यां मध्येच होतो असे नाही तर हा आजार आता स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारांमध्ये दिसून येतो. स्तनाचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. म्हणूनच कोणत्याही संकोच न करता तुमच्या समस्येची सखोल तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे खूप महत्वाचे आहे. सर्च येथील दवाखान्यात दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी कर्करोग ओपीडी तपासणी व उपचारासाठी उपलब्ध असणार आहे. तरी सर्वांनी या ओपिडीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन सर्चने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here