रस्ता बांधकामात अवैधरित्या खड्डे करणे चांगलेच भोवले ; मजूरासह अभियंत्यावर वनगुन्हा दाखल

0
35
गडचिरोली TODAY
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील पुराडा ते मालेवाडा रस्त्याच्या बांधकामात अवैधरित्या खड्डे तयार करणे संबंधितांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी वनविभागाने मजुरासह संबंधित बांधकाम अभियंत्यावरही वनगुन्हा दाखल केला आहे. 

अटक केलेल्या आरोपीसह वनविभागाचे कर्मचारी

प्राप्त माहितीनुसार, देवरी- चिचडग- कोरची- पुराडा- मालेवाडा-येरकड-गोदलवाही-कसनसूर-एटापल्ली अशा रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी वन विभागाकडून अटी व शर्तीच्या अधिन राहून बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुराडा-मालेवाडा या रस्ता बांधकामात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच राऊंड ऑफीसर के. व्ही. ढवळे यांनी राजू रविदास (31) यास अटक केली. तसेच यासंबंधी सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्र. 1 आणि अधिनस्त अभियंत्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर बांधकामामध्ये वापरात असलेल्या ग्राईंडरही जप्त करण्यात आले आहे. 

एकाला 28 पर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणातील आरोपी राजू रविदास याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोरे यांच्या मार्गदर्शनात राऊंड ऑफिसर ढवळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here