बिबट्याच्या तावडीतून बकरीची सुटका करण्यासाठी गेलेला इसम जखमी

0
34

संग्रहित छायाचित्र

Leopard Attack
गडचिरोली TODAY
आरमोरी : बिबट्याच्या तावडीतून बकरीची सुटका करण्यासाठी धावून गेलेला इसम बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना आरमोरी तालुक्यातील देऊळगाव पहाडीवर शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. खुशाल उरकुडा कोहळे (58) रा. देऊळगाव असे जखमी मजुराचे नाव आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या देऊळगाव येथील खुशाल कोहळे हे देऊळगाव येथील सर्वे क्रमांक 181 मधील पहाडीवर बक-या चारण्यासाठी गेले होते. शेळ्या चारत असताना जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्या कळपातील एका बकरीवर हल्ला केला. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून बकरीची सुटका करण्यासाठी कोहळे धावून गेले असता, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खुशाल यांना बिबट्याने कपाळावर व पाठीवर नखाने ओरबडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक राजेंद्र कुंभारे व इंजेवारीचे वनरक्षक नितेश तुमपल्लीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमी कोहळे यांना देऊळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here