गोगाव येथे शिवजन्मोत्सव उत्साहात

0
37
गडचिरोली TODAY
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवशंभू युवा प्रतिष्ठान गोगावच्या वतीने आज, 19 फेब्रुवारी रोजी मुख्य चौकात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्राम होकम होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राकॉंचे गडचिरोली शहराध्यक्ष तथा नपचे माजी सभापती विजय गोरडवार, प्रा. राकेश चडगुलवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, कॉंग्रेसचे गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सरपंच राजू उंदीरवाडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 

शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून गावातील मुख्य चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करून मान्यवरांच्या हस्ते फलकाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, 18 फेब्रुवारी रोजी मंडळाच्या वतीने महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त सायंकाळी शिवमंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविक, नागरिकांनी लाभ घेतला. शिवजयंती कार्यक्रमास गावातील महिला, पुरुष, बालगोपाल व शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवशंभू युवा प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here