उत्कृष्ट डिजिटल मिडिया पत्रकार पुरस्कार निलेश सातपुते यांना जाहीर

0
34
– ५ मार्च ला चंद्रपुरात पुरस्कार वितरण
गडचिरोली TODAY
गडचिरोली :  लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक तथा राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश सातपुते यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन चंद्रपूर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात ५ मार्च २०२३ रोजी करण्यात आले आहे. यावेळी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

निलेश सातपुते हे गत २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते  राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी असून लोकवृत्त न्यूज चे संपादक आहेत व गडचिरोली नामांकित पत्रकार आहे. निष्पक्ष निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वातंत्र्य ओळख निर्माण केली असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीयझ प्रशासकीय, क्रीडा व कृषी साहित्य, धार्मिक, क्षेत्रात त्यांनी सातत्याने लिखाण केले व अनेक प्रकरणांना वाच्याता फोडली. त्यांचे पत्रकारितेतील कार्य प्रेरणादायी आहे. नुकताच त्यांनी ६ जानेवारी २०२३ ला पत्रकार दिनाचे औचित्य साधून डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा येथोचित सत्कार सोहळा व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर परिचर्चा घडवून आणले व डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी आपल्या संकल्पनातून डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना एकत्रित आणून त्याकरिता विविध कल्याणकारी योजनेसह विमा कवच व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर महाराष्ट्र अभ्यास दौरा नियोजन करून आयोजन केलेले आहे. कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्येला लढा देण्याचे त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्यूज तर्फे यावर्षीचा डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातून निलेश जीवनदास सातपुते यांना जाहीर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here