कुरखेडा उपविभागीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

0
39
गडचिरोली TODAY
गडचिरोली : स्थानिक  उपविभागीय अधिकारी कार्यालयात हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले. 

 यावेळी नायब तहसिलदार रेखा बोके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे  एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार, किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले असल्याचे कार्य महाराजांची केले आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी अव्वल कारकून जगदीश राठोड, महसूल सहायक लोकेश कुनघाडकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here