आमसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव पारीत

0
38
गडचिरोली TODAY 
गडचिरोली : स्थानिक पंचायत समितीद्वारा आयोजित आमसभेत पुरातन प्रथेचा बिमोड करण्यासाठीचा प्रस्ताव हेमंत बोरकुटे यांनी मांडला. अस्तित्वात असलेली विधवा प्रथा बिमोड करुन विधवा स्त्रियांना सामाजिक दर्जा प्राप्त व्हावा, असा आग्रह धरला. यावर सभाध्यक्षांनी ठराव पारीत करीत सर्व ग्रामपंचायतीने सामाजिक दायित्व जोपासण्याचे निर्देशित केले.
 सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. यावेळी माजी पंस सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, पंस सदस्य नैताम, मडावी, गोहणे, श्रीम मडावी उपस्थित होते. वार्षिक आमसभेत महत्वपुर्ण विकास योजना आढावा तथा ठराव पारीत करण्यात आले. नळयोजना, शौचालय, रस्ते, नाली, रखडलेली सर्व परियोजना प्रभावाने पूर्ण करण्यांचे निर्देश अध्यक्षांनी दिले. सभेत सरपंचांनी ग्रामीण समस्या अध्यक्षाकडे मांडत सोडविण्याचा आग्रह धरला. प्रसंगी प्रश्न मार्गी लावण्याचे प्रशासनाला निर्देश आमदार डॉ. होळी यांनी दिले. सभेचे आभार विस्तार अधिकारी उकंडराव राऊत, यांनी मानले. यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी बेंडके, पातकमवार, शेडमाके, लांजेवार, सर्व महिला व पुरुष कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here