33 गोवंशाची सुटका : चार तस्करांना अटक

0
37

 

 सुटका करण्यात आलेली जनावरे

 

33 गोवंशाची सुटका : चार तस्करां अटक
– वांगेपल्ली गावाजवळील घटना
गडचिरोली POST
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात गोंवश जनावरे घेऊन जाणा-या ट्रकला वांगेपल्ली गावाजवळ ताब्यात घेत 33 जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चार तस्करांना मुसक्या आवळण्यात अहेरी पोलिस यशस्वी झाले आहेत. मोहम्मद अब्दूलनबी हातम (40), शेख नसीम शेख यासीन (40), मोहम्मद इरफान शेख हन्नान (29) तिघेही रा. मुर्तीजापूर ता. जि. अकोला व इम्रान खान अजीज खान (40) रा. लोणी टाकळी ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती असे आरोपींचे नाव आहेत.
छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीमार्गे तेलंगणा राज्यात अवैधरित्या गोवंशीय जनावरांच्या तस्करीचा गोरखधंदा सुरु आहे. सदर जनावरे कत्तलीसाठी तेलंगणात नेली जातात. याअंतर्गत अवैधरित्या जनावरांची तस्करी केल्या जाणार असल्याची गुप्त माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या बुधवारी अहेरी पोलिसांनी वांगेपल्ली गावाजवळ सापळा रचला होता. दरम्यान सी. जी. 24 एस. 2672 या क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या ट्रकची तपासणी केली असता 23 बैलांसह 10 गोवंश असा एकूण 33 जनावरे ताब्यात घेण्यात आली. यात 1 जनावर मृतावस्थेत आढळून आले आहे. या जनावरांची अंदाजीत किंमत 1 लाख 82 हजार रुपये एवढी आहे. तर चारचाकी वाहन अंदाजे किंमत 7 लाख असा एकूण 8 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
 सदर कारवाई अहेरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मानभव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जिजा घुटे, पोलिस उपनिरीक्षक करिश्मा मुंडे, पोलिस नाईक मोहन तुलावी यांचेसह अहेरी पोलिसांनी पार पाडली. सदर घटनेचा पुढील तपास पोउनि करिश्मा मुंडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here