ग्लोबल एज्युकेशन अवॉर्डने प्राचार्य डॉ. मुनघाटे सन्मानित

0
32

प्राचार्य डॉ. मुनघाटे यांना सन्मानित करताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर

सुनील गावस्कर यांच्याहस्ते सत्कार
गडचिरोली TODAY 
गडचिरोली : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांना ग्लोबल एज्युकेशन एक्सप्लेन अवार्डने सन्मानित करण्यात आले. विश्वविख्यात क्रिकेटपटू लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या हस्ते दिल्ली येथील सोहळ्यात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
 गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागातील शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांना देण्यात आला. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे हे गोंडवाना विद्यापीठातील अनुभवी व उपक्रमशील प्राचार्य म्हणून सर्वत्र ओळखले जातात. त्यांनी आपल्या कार्यकाळात महाविद्यालयाचे नाव जागतिक स्तरावर नेऊन पोहोचविलेले आहे. भारतामधून इंटरशाला रँकिंगमध्ये महाविद्यालयाचा 502 वा क्रमांक असून महाविद्यालयाने जागतिक क्यूएस सर्वेक्षणात भाग घेतला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत इन्स्टिट्यूट इनोव्हेशन सेल यामध्ये महाविद्यालयाला गत दोन वर्षापासून एक स्टार नामांकन प्राप्त झाले आहे. 
प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे हे नँक समितीचे गुणांकन व मानांकन समितीचे सदस्य आहेत. यापूर्वी प्राचार्य डॉ. मुनघाटे यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार व विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स हे प्राइम टाइम कडून शैक्षणिक क्षेत्रातील बंधुत्वाचे कार्य करणा-यांचा आणि प्रवर्तकांना नेत्रदीपक शैलीत सन्मानित करण्यासाठी कौतुकाचा एक छोटासा प्रतीक आहे. या पुरस्कारांचा हेतू इतरांना मोठ्या आणि चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील प्राचार्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here