दुचाकी अपघात ; उपसरपंच जखमी

0
36

जखमीची विचारपूस करताना भाग्यश्री आत्राम

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दुचाकीच्या अपघातात उपसरपंच गंभीर जखमी झाल्याची घटना अहेरी तालुक्यातील सिलमपल्लीजवळ घडली. रवींद्र कोरेत असे जखमी उपसरपंचाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, उमानूरचे उपसरपंच रवींद्र कोरेत हे टेकडा येथील तेरवी कार्यक्रम आटोपून सिलमपल्ली येथे दुचाकीने परत जात होते. दरम्यान, त्यांचा दुचाकीवरून तोल जावून अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती नागरिकांना मिळताच, जखमी उपसरपंचांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती माजी जिप अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांना मिळताच त्यांनी अहेरी रुग्णालयात भेट देवून उपसरपंच रवींद्र कोरेत यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी राकॉंचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, चिंचगुंडीचे उपसरपंच रामू कस्तुरवार, बाबुराव तोर्रेम, सुमित मोतकूरवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here