मांस खाण्याची हौस पडली महागात : शिकारीच फसला वनविभागाच्या जाळ्यात

0
38

हरणाची शिकार करणाऱ्या आरोपीसह वनविभागाचे पथक

GADCHIROLI TODAY 
कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा वन परिक्षेत्रातील जंगलात हरणाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने एका शिकाऱ्यास जाळ्यात अडकवल्याची कारवाई मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास केली. महादेव धोंडू तुलावी (60) रा. गेवर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मांस खाण्याची हौस त्याला चांगलीच महागात पडली आहे. 
गेवर्धा राखीव वन खंड क्र. 133 मध्ये शिकारी घडून येत असल्याच्या माहितीवरुन वन विभागाचे पथक गस्तीवर होते. दरम्यान सोमवारी, 6 मार्च रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास जंगलातून जाणारी 33 केव्ही विद्युत वाहिनी ट्रीप झाली. लाईन दुरुस्ती करिता महावितरणच्या पथकासोबत वन विभागाचे पथकही जंगलातच होते. लाईनमधील बिघाड दुरुस्ती दरम्यान रात्री 2 वाजता विद्यूत तारांवर आकडा टाकून वीजप्रवाह सोडून हरिणाची शिकार केल्याची बाब गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाच्या लक्षात आली. घटनेची पाहणी करून वीज प्रवाह सुरळीत करण्यात आला. दरम्यान आरोपीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सदर जंगल परिसरात सापळा रचला. या सापड्यात महादेव तुलावी अलगद अडकला. 
गेवर्धा येथील हरणीच्या शिकार प्रकरणात अडकलेला महादेव धोंडू तुलावी या आरोपीस यापूर्वीही दोनदा शिकार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र सदर प्रकरणात सबळ पुराव्याअभावी तो निर्दोश सुटला होता. त्याने यापूर्वी अनेकदा जंगली प्राण्यांचे शिकार केले असल्याचे बोलले जाते. परंतु आता तो रंगेहात अडकला गेला. अरोपीस कुरखेडा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची 21 मार्चपर्यंत चंद्रपूर येथील न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ही कारवाई गेवर्धाचे क्षेत्र सहायक एस. जी. झोडगे यांच्या नेतृत्वात गेवर्धाचे वनरक्षक एस. डी. लेखामी, खेडगावचे वनरक्षक एस. व्ही. पिलारे, गुरनोलीचे वी. बी. पावडे, खैरिटोलाचे व्ही. एल. हातमोडे, वनमजूर अरुण डोंगरवार, प्रभू गायकवाड, हरी नैताम, मनोज वालदे यांनी केली. 
  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here