अनियंत्रित चारचाकी पुलावरून कोसळली ; दोन जखमी

0
37

अपघातग्रस्त वाहन

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : अनियंत्रित चारचाकी पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील लेंडारी गावानजीक गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सरफराज खालिद शेख (24) रा. शिरपुर, प्रणय पुरुषोत्तम उईके (22) रा. गांगोली असे जखमींचे नाव आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दोन्ही युवक देवरी येथून कार्यक्रम आटोपून चारचाकीने शिरपूरकडे परत येत होते. दरम्यान, चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी पुलावरून खाली कोसळली. हा अपघात मध्यरात्री लेंडारी नाल्यावर झाल्याने अपघातग्रस्तांना कुठलीही मदत मिळाली नाही. सदर वाहनाचे चारही दरवाजे लॉक झाले होते. त्यामुळे दोन्ही युवकांना जखमी अवस्थेत रात्रभर वाहनातच राहावे लागले. दरम्यान, सकाळच्या सुमारास एका युवकाला अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्याने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेची माहिती मिळताच कुरखेडा येथील सोहम कांबळे यांनी मित्रांसमवेत घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. या अपघातात सरफराज शेख याला किरकोळ मार लागला असून प्रणय उईके याचा डावा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here