अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षाची शिक्षा

0
31

 

 

GADCHIROLI POST
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलराव पेठा माल येथे अंगणवाडी सेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी सिरोंचा येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी श्रीकांत पचंडी यांनी  आरोपीस तीन वर्षे कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. राजू पेंटय्या पुपाला (36) रा. विठ्ठलराव पेठा माल असे त्या आरोपीचे नाव आहे.
 2021 मध्ये ही घडना घडली होती. पीडित अंगणवाडी सेविकेला सुरुवातीला इशारा केला, त्यानंतर अंगणवाडीत जाऊन अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली. महिलेने आरडाओरड केल्यावर लोक गोळा झाले. त्यानंतर तो निघून गेला. विनयभंग केल्याप्रकरणी राजू पुपालाविरुद्ध रेगुंठा उपपोलिस केंद्रात फिर्याद नोंद झाली होती. प्रभारी अधिकारी विजय सानप यांनी तपास करून राजू पुपालाविरुद्ध सिरोंचा येथील प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी श्रीकांत पचंडी यांनी आरोपी राजू पुपाला यास दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम व एक वर्ष साधा कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकिल सचिन दरेकर यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस अंमलदार संतोष गुमला यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here