नवविवाहितेची आत्महत्या : पती, सासू, सासरा व दिराला अटक

0
37

 

GADCHIROLI POST
कुरखेडा : सासुरवाडीतच गळफास घेतलेल्या अवस्थेत एका नवविवाहीतीचा मृतदेह आढळल्याची घटना तालुक्यातील खरकाडा येथे रविवारी उघडकीस येताच एकच खळबळ निर्माण झाली होती. याप्रकरणी मृतक महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू, सासरा व दिराला अटक केली आहे. हर्षदा महेश बंसोड (२३) असे मृतक महिलेचे नाव आहे.
देसाईगंज तालूक्यातील बोडधा येथील हर्षदा गायकवाड हिचा विवाह मागील वर्षी १९ एप्रील २०२२ रोजी खरकाडा येथील महेश बंसोड याचाशी झाला होता. घटनेच्या पहिल्या दिवशी मृतक महिलेने आपल्या वडिलांना फोन करीत घरी घेऊन जाण्याबाबत बोलली होती अशी माहिती आहे. मात्र, वडील घरी पोहचण्यापूर्वीच तिच्या मृत्युची बातमी मिळाल्याने त्यांना धक्काच बसला. यावेळी त्यांनी मुलीचे शवविच्छेदन कुरखेडा येथील रुग्णालयात करण्यास विरोध केल्याने तिचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. यानंतर रात्री मृतदेह घेऊन पोलिस स्टेशनला पोहचले व आपल्या मूलीला शारिरीक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार कुरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली.
कुरखेडा पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पती महेश बाबूराव बंसोड, सासरा बाबुराव ऋषी बंसोड, सासू उषाबाई बाबूराव बंसोड व दिर प्रणय बाबूराव बंसोड या चौघा विरोधात भारतिय दंड संहिता १८६० चा कलम ३०४ ब,३०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करीत सोमवारी सकाळी चौघांनाही अटक केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here