बसच्या धडकेत युवक ठार

0
45

GADCHIROLI POST
गडचिरोली. गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृयू झाल्याची घटना 17 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नगरीजवळ घडली.
अर्जुन बारसागडे (25) रा. काटली असे मृतक युवकाचे नाव आहे. तो शुक्रवारला सायंकाळी 7 वाजता फॅक्टरीवरून मोहझरीकडे येत होता. याचवेळी नागपूरवरुन गडचिरोलीकडे येणा-या एसटी महामंडळाच्या बसने त्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here