जुनी पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे सामूहिक मुंडन आंदोलन

0
32

– कर्मचारी आक्रमक
GADCHIROLI POST
गडचिरोली : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक झाले असून आलापल्ली वनविभागाच्या प्रकाष्ठ निस्कान वर्कशॉप कार्यालयासमोर बसून विविध विभागातील कर्मचा-यांनी घोषणाबाजी करीत शासनाप्रती रोष व्यक्त करून आज सामूहिक मुंडन आंदोलन केले.
जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्यभरात जवळपास 18 लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा या बेमुदत संपाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वनविभाग, शिक्षण, आरोग्य विभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे. संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागातील कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून कर्मचारी मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आलापल्ली वनविभागाच्या प्रकाष्ठ निष्कासन वर्कशॉप कार्यालयासमोर संप करीत असलेल्या कर्मचा-यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करून आज सामूहिक मुंडन आंदोलन केले. कर्मचारी मागणीला घेवून ठाम असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here