गडचिरोली कॉम्प्लेक्स परिसरात वाघाचा प्रवेश

0
31

नागरिकांंमध्ये दहशतीचे वातावरण
GADCHIROLI POST
गडचिरोली : गडचिरोली शहरातील आयटीआय चौकातील कृषी महाविद्यालयाच्या नर्सरीममध्ये वाघ दिसून आल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नर्सरी परिसरात दाखल झाले असून वाघावर पाळत ठेऊन आहेत.
शहरातील कॉम्प्लेक्स परिसरातील कृषी महाविद्यालय जवळ असेलल्या नर्सरीमध्ये वाघ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली होती. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे पथक नर्सरी परिसरात दाखल झाले. सोबतच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजूस जंगल असल्याने त्या मार्गे हे वाघ शहरात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या वाघांना जेरबंद करण्यासाठी चंद्रपूरहून विशेष पथक गडचिरोलीसाठी रवाना झाले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. वाघ दिसून आलेल्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here