‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’ चे 22 ला शुभारंभ 

0
35
गुढीपाढव्याला अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते उद्घाटन
GADCHIROLI POST 
गडचिरोली : पूर्व विदर्भातील लोकांसाठी लक्षवेधी ठरणारे गडचिरोली जिल्हा मुख्यालयात कपड्यांचे शोरूम असलेल्या ‘बी-फॅशन प्लाझा’ शॉपिंग मॉलचा शुभारंभ 22 मार्चला होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे  यांच्या हस्ते होत आहे.
शहरातील चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर बट्टूवार पेट्रोलपंपाच्या बाजुला बी-फॅशन प्लाझा या कापड दुकानाची भव्य शोरुम निर्माण करण्यात आली आहे. या शोरुमच्या उद्घाटनासाठी बी-फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले (ठाकूर) यांनी मराठी अभिनेत्री किशोर शहाणे यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. ग्राहकांचे हित जोपासत देवकुले बंधुंनी शहरातील त्रिमूर्ती चौकात गेल्या 30 वर्षापासून विविध व्हेरायटीचे कपडे, साड्या, शालू, बनारशी शालू, कांजीवरम, पैठणी, सिल्क आदी साड्यांसह, लग्नाचा बस्ता, अहिरपट्टीची मोठी शृंखला आदी ग्राहकांच्या सेवेत अगदी माफक दरात उपलब्ध करुन देत आहेत. ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासोबतच दर्जेदार कापड उपलब्ध करुन देण्यासाठी चंद्रपूर महामार्गावर भव्य शोरुमची स्थापना केली आहे. या शोरुमचा शुभारंभ सोहळा 22 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बी-फॅशन प्लाझाचे संचालक शैलेश देवकुले व हिमांशू देवकुले यांनी दिली. विशेष म्हणजे गडचिरोली शहरात प्रथमच येत असलेल्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांना जवळून बघण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here