जिल्ह्यातील दक्षिण भागात भूकंपाचे सौम्य धक्के

0
38

अहेरी तालुक्यातील महागावात हादरे
GADCHIROLI POST
गडचिरोली : तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाचे सौम्य हादरे अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) गावालाही बसले आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तेलंगणा राज्यातील शिरपूर कागजनगर परिसरासह 10 किमी सीमावर्ती भागात आज, मंगळवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के बसले.भूंकपांची तीव्रता 3.1 रिस्टल स्केल एवढी आहे. गोदावरी फॉल्ट मध्ये सदर भूकंप झाला असून हे भूकंप प्रवण केंद्र आहे. या भूकंपाचे धक्के चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी परिसरासह जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) गावालाही जाणवले. गावातील नागरिकांनी या भूकंपाची माहिती भ्रमणध्वनीवरुन अहेरी येथील प्रसारमाध्यमांना दिली. या वृत्तास आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here