कपड्यांच्या दुनियेत ‘बी- फॅशन प्लाझा’ चा डंका

0
56
गडचिरोलीत मिळणार मोठमोठया कंपनीचे ब्रँडेड कपडे 
गडचिरोली. महानगरांच्या तुलनेत गडचिरोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक कारणांमुळे नागपूर, चंद्रपूर या मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र आता जिल्ह्यातील चित्र हळूहळू बदलत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात महानगरांच्या सोयीसुविधा मिळत आहेत. यासाठी शहरातील व्यापारी बांधवांनी धाडसी पाऊले उचलली आहेत. महानगरांशी स्पर्धा करू शकणारे कपड्यांचे भव्यदिव्य शोरूम गडचिरोली शहरात सुरू झाले आहे. शहराच्या मध्यभागी ‘बी-फॅशन प्लाझा फॅमिली शॉपिंग मॉल’ ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. त्यामुळे कपड्यांच्या दुनियेत आता ‘बी-फॅशन प्लाझा’ चा डंका वाजणार आहे.
शहरातील त्रिमूर्ती चौकात असलेले बी-फॅशन प्लाझा कपड्यांसाठी एक विश्वसनीय ठिकाण आहे. बदलत्या फॅशननुसार या दुकानात कपड्यांची नवनवीन व्हेरायटी उपलब्ध केली जाते. त्यामुळे शहरवासीयांना कपड्यांच्या खरेदीसाठी इतरत्र भटकावे लागत नाही. परिवाराला लागणारे सर्वच कपडे या दुकानात मिळत असल्याने शहरातील नागरिक आपल्या परिवारासह कपडे खरेदीचा आंनद घेतात. कपड्यांची क्वालिटी व रेंज मोठ्या शहरातील कपड्यांच्या शोरूमसारखी असल्याने बी-फॅशन प्लाझा गडचिरोलीकरांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. बी-फॅशन प्लाझाने कपड्यांच्या दुनियेत आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गडचिरोलीत स्थायी होणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. जिल्हा मुख्यालय असल्याने येथे बाहेरून येणारे अधिकारी-कर्मचारी सुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे त्यांना गडचिरोलीतच मोठ्या शहरांसारखी सोयीसुविधा मिळावी, अशी अपेक्षा आहे. यासाठी आता बी-फॅशन प्लाझाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गडचिरोली शहरात कपड्यांची भव्यदिव्य अशी शोरूम उघडण्यात आली आहे. चंद्रपूर रोडवरील बट्टूवार पेट्रोल पंपच्या बाजूला सुसज्ज ‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’ चे उद्घाटन बुधवार, 22 मार्च रोजी गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
शॉपिंग मॉलची तीन फ्लोअरमध्ये विभागणी
हे शॉपिंग मॉल 33 हजार स्केअर फूट एरियात निर्माण करण्यात आले आहे. येथे 11-11 हजार स्केअर फूटचे तीन फ्लोअर तयार करण्यात आले आहे. या शॉपिंग मालमध्ये पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राउंड फ्लोअरमध्ये लहान मुलांच्या कपड्यांची (किड्स वेअर) दुकान आहे. सेकंड फ्लोअरला महिलांसाठी सर्व व्हेरायटीसह कपड्यांची शोरूम आहे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या साड्या, सलवारसूट व ब्रॅण्डेड कपड्यांचा समावेश आहे. महिलांना कपडे खरेदीसाठी आरामदायक बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. थर्ड फ्लोअरमध्ये पुरुषांच्या कपड्यांची दुकान असून येथे सर्वप्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. याठिकाणी पुरुष मंडळी सुद्धा आरामदायक बैठक व्यवस्थेसह कपडे खरेदीचा आनंद घेऊ शकतात.
वातानुकूलित सोबत अनेक सुविधा
या शॉपिंग मॉलमध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचेच कपडे एका छताखाली उपलब्ध आहेत. संपूर्ण शॉपिंग मॉल वातानुकूलित असून ग्राहकांसाठी अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वच्छ प्रसाधन कक्ष, चेंजिंग रूम, लहान बाळ व मातांसाठी रेस्ट रूमची सुविधा आहे. लहान मुले, महिला व पुरुषांसाठी फुटवेअर दुकान (चप्पल-जोडे) याठिकाणी आहे. महिलांसाठी मेकअप सामान (कास्मेटिक) विक्रीसाठी आहे. त्यामुळे अनेक परिवारांसाठी हे शॉपिंग मॉल एक उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
उच्च कंपनीचे ब्रँडेड कपडे उपलब्ध
बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉलमध्ये कपड्यांची सर्व व्हेरायटी उपलब्ध आहे. यामध्ये नावाजलेल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ब्रँडेड कपड्यांचाही समावेश आहे. या शॉपिंग मॉलचे संचालक मनोज देवकुले यांनी सांगितले की, ब्रँडेड कपडे व साड्यांच्या किंमतीमध्ये कुठेही फरक आढळणार नाही. भारताच्या कोणत्याही शहरात कपड्यांच्या किंमतीत फरक आढळल्यास पैसे परत देऊ. गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये असणारे सर्व कपडे येथे मिळतील. लोकांच्या प्रतिसादामुळेच बी-फॅशन प्लाझाने आपली ओळख निर्माण केली आहे. अत्याधुनिक फॅमिली शॉपिंग मॉल हे आमच्यावर प्रेम असणाऱ्या सर्व हितचिंतकांना समर्पित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here