नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला

0
33

– क्लेमोर माईन्स, कुकर बॉम्बसह स्फोटक साहित्य हस्तगत

गडचिरोली POST
गडचिरोली. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी क्लेमोर माईन्स, कुकर बॉम्बसह पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे नक्षलवाद्यांनी आखलेला घातपाताचा डाव फसला आहे.
भामरागड तालुक्यातील पोमकें धोडराज हद्दीमध्ये पोलीस दलाचे विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नेलगुंडा परिसरातील गोंगवाडा मार्गावर एक क्लेमोर माईन्स, महाकापाडी रोडवर एक कुकर बॉम्ब, महाकापाडी पगदंडीवर एक कुकर बॉम्ब मिळुन आला. यासोबतच १ नग बॅटरी, १ नग क्लेमोर करीता वापरलेला ३ फुटाचा लोखंडी पाईप व ३ बंडल इलेक्ट्रीक वायर ७० मीटर लांबीचे इत्यादी नक्षल साहीत्य हस्तगत करण्यात आले. तसेच दोन वेगवेगळ्या रस्त्यावर मिळुन आलेले २ कुकर बॉम्ब व १ क्लेमोर माईन्स हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवर नष्ट करण्यात आले असून, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक व बी. डी. डी. एस च्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभियानात सहभागी सर्व जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहे. नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here