कार-दुचाकी अपघातात 3 जण गंभीर

0
32

– कुरखेडा-वैरागड मार्गावरील घटना

गडचिरोली POST

कुरखेडा : कार व मोटासायकलची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाच गावातील तीनजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास कुरखेडा- वैरागड मार्गावरील कढोली येथे घडली. रघू पुरुषोत्तम साहारे (17), ललीता दिलीप धोंडणे (50), गिता मारोती साहारे (50) सर्व रा. शिरपूर अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार रघू साहारे, ललीता धोंडणे, गिता साहारे हे तिघेजण एमएच 33 वाल 1163 या क्रमांकाच्या मोटारसायकलने कढोली वरून शिरपूरला जात होते. दरम्यान, कुरखेडा-वैरागड मार्गावरील टी-पाईटंवर समोरुन येणाऱ्या सीजी 04 एचसी 5049 क्रमांकाच्या कारची मोटारसायकलला समोरासमोर धडक बसली. यात दुचाकीवरील 17 वर्षीय मुलासह दोन महिला गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here