नक्षल्यांनी उभारले नर्मदाक्काचे स्मारक

0
47

– एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली

गडचिरोली POST

गडचिरोली. नक्षली चळवळीद्वारे टीसीओसी कालावधी साजरा केला जात आहे. याअंतर्गत रविवारी शहीद दिवसाचे औचित्य साधून एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गट्टा-तोडगट्टा मार्गावर नक्षल्यांनी जहाल महिला नक्षली नर्मदाक्काचे स्मारक उभारण्यात आले.
नक्षल्यांच्या टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाद्वारे नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून नक्षल्यांच्या हिंसक कारवायांना अंकुश लावण्यातही मोठे यश मिळवले आहे. अशा स्थितीत नक्षली अतिसंवेदनशील भागात आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच कालावधीत रविवारी शहिद दिनाचे औचित्य साधून नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील भाग असलेल्या गट्टा-तोडगट्टा रस्त्याच्या कडेला नक्षल्यांनी जहाल महिला नक्षली नेता नर्मदा हिचे स्मारक उभारले. नर्मदा हीचे मागील वर्षी निधन झाले होते. तिने बराचसा काळ तोडगट्टा परिसरात घालविला होता. त्यामुळे याच भागात नक्षल्यांनी स्मारक उभारल्याचे बोलल्या जात आहे. तसेच याच स्मारकापासून काही अंतरावर सुजाता हिचेही लहान स्मारक उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here