अबुजमाडच्या जंगलात एका नक्षलवाद्यास कंठस्नान

0
54

– घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात नक्षली साहित्य जप्त

गडचिरोली POST
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात शनिवार सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एका नक्षलवाद्यास कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.
गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाने शनिवारी सकाळी भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर अबुझमाड परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवले. दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठासुद्धा जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिला असून, चकमक अद्याप सुरू असल्याचे कळते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. यासंदर्भात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सायंकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here