सी-60 जवानाचा तलावात बुडून मृत्यू

0
34

– चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील घटना

गडचिरोली POST
गडचिरोली : जिल्हा पोलिस दलातील नक्षलविरोधी सी-60 पथकातील एका जवानाचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे बुधवारी उघडकीस आली. आकाश मुन्सी लेकामी (30), रा. पिपरी ता. एटापल्ली असे मृतक जवानाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आकाश लेकामी हे गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या सी 60 या नक्षलविरोधी अभियान पथकात कार्यरत होते. पत्नी माहेरी असल्याने ते मंगळवारी सासुरवाडीत अडंगेपल्ली येथे एक दिवसाची सुट्टी घेऊन गेले होते. दरम्यान, रेगडी येथील कन्नमवार तलावात ते पोहोण्यासाठी एकटेच गेले होते. मात्र, ते परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते सापडले नाहीत. बुधवारी सदर जवानाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असल्याचे कळते. पुढील तपास रेगडी पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक कल्पेश मगरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here