महिला नाट्यकलावंताची गळफास घेऊन आत्महत्या

0
31

– देसाईगंज शहरातील घटना
देसाईगंज : झाडीपट्टीतील महिला नाट्यकलावंताने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना देसाईगंज शहरात आज २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आनंदा नैताम असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
आनंदा नैताम ही देसाईगंज येथे भाड्याने खोली करून राहत होती. तीने रात्रीच्या सुमारास आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार सकाळी उघडकीस आला. देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय वडसा येथे शवविच्छेदनाकरीता पाठविला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here