एका महिलेसह तीन गांजा तस्करांना अटक

0
34

– सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त
– गडचिरोली पोलिस दलाची कारवाई

गडचिरोली POST
गडचिरोली : स्थानिक इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून साडेसहा किलो गांजासह सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी केली. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिलेसह तीन गांजा तस्करांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. आशिष धनराज कुळमेथे (28) रा. संजयनगर, धनराज मधुकर मेश्राम (33) रा. नेहरुनगर, ज्योती श्रीकृष्ण परचाके (22) रा. शास्त्रीनगर सर्व जि-चंद्रपुर असे आरोपींचे नाव आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून एम.एच.34 बी.आर.4086 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनाच्या डिक्कीत एकुण 99 हजार 690 रुपये किंमतीचा 6.646 किग्रॅ गांजा, 6 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन तसेच 20 हजार रुपये किंमतीचे मोबाईल असा एकुण 7 लाख 19 हजार 690 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. याप्रकरणी आरोपीतांविरुध्द गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास मपोउपनि संघमित्रा बांबोळे करीत असुन आरोपीतांना न्यायालयासमक्ष हजर केले असता, 31 मे पर्यंत आरोपीना पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात मसपोनि रुपाली पाटील, पोहवा नरेश सहारे, पोहवा हेमंत गेडाम, पोना सतिश कत्तीवार, पोना राकेश सोनटक्के, पोशि उमेश जगदाळे, पोशि सचिन घुबडे, पोशि माणिक दुधबळे, मपोहवा लक्ष्मी बिश्वास, मपोना सविता उसेंडी, चापोना माणिक निसार, चापोना मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here